उन्हाचा त्रास पुरुषांनी डोक्यावर टोपी आणि महिलांनी स्कार्फचा वापर करावा. | Summer Health Tips

 


अलीकडे महाराष्ट्रात तसेच देशात तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस च्या पुढे गेलेले आहे. या तापमान वाढीचा मानवी शरीरावर ही दुष्परिणाम होत आहे. काळजी न घेण्यामुळे बरेचशे लोक आजारी पडत आहेत. आजारावर उपाय शोधण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी

कडक उन्हाचा त्रास शेतमजूर महिलांना मोठ्या प्रमाणात होत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी या महिला डोक्यावर पांढरी टोपी व अंगात पांढरा शर्ट घालत आहेत.

सध्या कांदा व हळद काढण्याचे काम जोरात सुरू आहे. कांदा काढणीसाठी महिला सकाळी नऊ वाजता शेतावर येतात. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्या काम करतात. उन्हाचा चटका लागू नये म्हणून पांढऱ्या टोपीचा वापर करीत आहेत. त्याचबरोबर अंगामध्ये शर्ट देखील परिधान करतात.

शेतामध्ये महिलांना उष्माघाताचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विशेष काळजी

घ्यावी लागत आहे. जुन्नर तालुक्यात सध्या सगळीकडे कांदा काढण्याचे काम सुरू आहे. कांदा काढणी करणारे मजूर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विशेष काळजी घेताना दिसतात. काही मजूर डोक्यावर छत्रीची सावली तयार करतात.

शक्यतो पूर्णपणे उन्हात काम करणे टाळावे. तसे शक्य न झाल्यास झाडाच्या सावलीला बसून कांदा काढण्याचे काम करावे. डोक्यावर ओले फडके बांधावे. डोळ्याला त्रास होणार नाही,

यासाठी शक्य असेल तर गॉगलचा वापर करावा.

उन्हापासून संरक्षण असे करा ..

1.   पुरुषांनी डोक्यावर टोपी आणि महिलांनी स्कार्फचा वापर करावा.

 उघड्या डोक्यास काळया केसामुळे ऊन खूप लागते. काळा रंग हा प्रकाशाचे परावर्तन करत नाही. त्यामुळे केसांमध्ये उष्णता शोषली जाते. उष्णता शोषली गेल्यामुळे उन्हामुळे डोके दुखू लागते. त्यामुळे पुरुषांनी शक्यतो लाईट रंगाची टोपी आणि स्त्रियांनी स्कार्फ चा वापर केला पाहिजे.

2.   वेळोवेळी पाणी प्यावे.

उन्हामध्ये आपल्या शरीरातील पाणी कमी होत असते. घाम जास्त आल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तहान जरी नाही लागली  तरी थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे पाणी पीत राहिले पाहिजे. त्यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन राहील.

3.   सैल कपड्यांचा वापर करावा.

उन्हाळ्यात मुली किंवा स्त्रिया या अंगाला टाईट कपड्यांचा वापर करतात. त्यामुळे घाम येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे सैल कपड्यांचा वापर करावा. सेल कपडे वापरल्यामुळे खेळत्या हवेचे प्रमाण वाढते, त्यामुळे घाम कमी येतो आणि शरीराला सुद्धा सुरक्षितता वाटते. जास्त टाईट कपडे वापरल्याने जास्त घाम येऊन गजकर्ण सारखे आजार उद्भवू शकतात.

       4. जरुरी काम असेल तरच घरातून बाहेर पडा.

आपण तर जाणतोच उन्हाळा त्रीव्र होत आहे, तरीसुद्धा काही तरुण मंडळी या उन्हात सुद्धा कारण नसताना भटकंती करत असलेली दिसून येतात, क्रीडांगणावर खेळत असलेले दिसून येतात, अशा वेळेस यावर आपल्या सर्वांचे नियंत्रण असले पाहिजे. अन्यथा उन्हाळ्याच्या आरोग्याच्या समस्ये ला आपल्याला सामोरे जावे लागेल.

         5. डोळ्याला काळा गॉगल घालने आवश्यक

  उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्याचा डोळ्यावर विपरीत परिणाम होत असतो. डोळे जळजळणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे इत्यादी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे घरातून बाहेर पडत असताना आपण काळा गॉगल घालने आवश्यक आहे.

         6. वेळोवेळी लिंबू सरबत पिणे.

उन्हाळ्यामध्ये घामाच्या रूपामध्ये शरीरातील सोडियम क्लोराइड चा भाग कमी होत असतो. तो भरून काढण्यासाठी वेळोवेळी लिंबू सरबत पिणे आवश्यक आहे.

        7. उन्हात छत्रीचा वापर करावा.

उन्हाळ्यामध्ये आपण डोक्याला टोपी,तोंडाला स्कार्फ घालून उन्हापासून संरक्षण करीत असलो तरी या सर्वात जास्त उन्हापासून संरक्षण करण्यास सक्षम उपकरण म्हणजे छत्री. छत्रीचा वापर जर आपण केला तर जास्तीत जास्त उन्हापासून आपण संरक्षण करू शकतो. तरुणांना छत्री घेऊन फिरणे आजकाल आवडत नाही. तरीपण छत्रीचा वापर खूप आवश्यक आहे.

आपल्या मित्र परिवाराला पाठवा 👇

 

 


थोडे नवीन जरा जुने