लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे. हे उल्कापिंडामुळे तयार झाले. बेसाल्ट खडकामधील हा एकमेव प्रमुख हॉव्हरबॅक आहे. त्याचे पाणी अल्कधर्मी आहे.याची निर्मिती फार वर्षापूर्वी एका उल्कापातामुळे झाली. हे सरोवर औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. एवढ्या अंतरावर आहे. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती सरोवर (विवर) आहे आणि या विवरचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. तसेच या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची जुनी मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे सरोवरात (विवरात) आहेत. तर काही आणखीन मंदिरे आजूबाजूच्या परिसरात आहेत
सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे.
सरोवरात महादेवाची मंदिरे आहेत व कमाळजा देवी मंदिर आहे या तळ्यातील
पाणी खारे आहे. बेसोल्त खडकांचे प्रमाणही आहे
अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था(U.S.A), युनायटेड
स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल
रिसर्च लॅबोरेटरी, इंडिया इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, खरगपूर (इंडिया)
यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे. आता महाराष्ट्रातील नांदूर
मध्यमेश्वर नंतर लोणार सरोवर हे दुसरे रामसर पाणथळ स्थळ ठरले आहे.
सरोवर निर्मिती
पूर्वी लोणार सरोवर हे ज्वालामुखी प्रमाणेच भूगर्भीय प्रक्रियेमुळे
निर्माण झाले असे मानले जात होते. पण एक अतिवेगवान धूमकेतू किंवा उल्का तिथे
आदळल्याने ते निर्माण झाले असे सिद्ध झाले. तिथे प्लँगिओक्लेज नावाचे खनिज सापडले
आहे. हे खनिज एकतर मास्केलिनाइट मध्ये रूपांतरित झाले आहे किंवा त्याच्यामध्ये
प्लेनर डिफॉर्मेशन[मराठी शब्द सुचवा] वैशिष्ट्ये आहेत. असे फक्त अतिवेगवान
वस्तूच्या आघातामुळेच होऊ शकते. त्यामुळे सरोवराची निर्मिती उल्केमुळे झाली यावर
शिक्कामोर्तब झाले आहे.
सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे. उल्का
पूर्वेकडून ३५ ते ४० अंशांच्या कोनाने आली आणि आदळली.
विवर (लोणार इतिहास)
पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले.
त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास लोणार हे नाव मिळाले. ब्रिटिश अधिकारी
जे. ई. अलेक्झांडर यांनी इ.स. १८२३ मध्ये या विवराची नोंद केली. तसेच आईना-ए-अकबरी,
पद्म
पुराण व स्कंध पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन
ग्रंथात या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे.
महाराष्ट्राचे लोणार सरोवर हे एक आश्चर्य
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी लोणार सरोवर हे एक आश्चर्य ठरले
आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा
करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या
मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन
काळातील एक अभेद्य दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील
कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील
लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.
सरोवरासंदर्भात अनेक रहस्ये
या सरोवराबाबत अनेक दंतकथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते. लोणासुर नावाचा एक राक्षस होता, ज्याचा वध भगवान विष्णूने केला. त्याचे रक्त परमेश्वराच्या पायाच्या बोटाला लागले होते, ते काढण्यासाठी परमेश्वराने आपला अंगठा मातीत टाकला तेव्हा तेथे खोल खड्डा तयार झाला..
कोणीही सरोवरात जात नाही
या सरोवराचे रहस्य ऐकून बरेच लोक हे पाहण्यासाठी येतात. परंतु कोणीही तलावाच्या आत जात नाही. वेळोवेळी सरोवरासंबंधीचे गूढ रहस्य उलघडण्याचा प्रयत्नही झाले आहेत, ज्याचे उत्तर आजतागायत समोर आलेले नाही.
.jpeg)