आयुष्य आणि सोशल मिडिया

हल्ली सोशल मिडीया मानसाच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. अगदी सहज आपण आपले आनंदाचे क्षण, आपले अनुभव, भावना अथवा विचार सोशल मिडीया- वर टाकत असतो. एक मोठे जग एका क्लिक इतक्या अंतरावर येऊन ठेपणे पण कुठलीही गोद चांगल्यासोबतच वाईट गोष्टी घेऊन येते. दुसऱ्यांच सोशल मिडीयावर दिसणारं चांगले आयुष्य पाहून आपलं आयुष्य तसं का नाही याबद्दल खत व्यक्त करणारी एक मोठी गर्दी तयार झाली आहे. मग स्वतःच्या आयुष्याबददल उदासीनता,. असमाधान तयार होऊ लाागला आहे. कित्येकांच्या मनात, आयुष्यतील समाधानानेही जगता येते ही कल्पनाच कुठेतरी लोप पावत चालली. जे सोशल मिडीयावर दिसते तसेच माणसाचे आयुष्य नसतेच मुळात. लोक चांगले क्षण, पोस्ट करतील याचा अर्थ त्यांच्या आयुष्यात दुःख, अड्चणी, डिप्रेशन्, उदासीनता, स्ट्रेस अनेसेलच असे नाही ना. प्रत्येकाचं आयुष्य एक पोकळी आहे आणि पोकळीतलं दुःख पोकळीत राहणाऱ्या लाच माहिती असतं. जितक्या लवकर स्विकारता बरं. पहा, आनंद घ्या पुढे जा पण स्वतःशी तुलना करू नका इतकेच ! - लक्ष्मण ठाकरे
थोडे नवीन जरा जुने