हिंदू धर्मात करदोडा का बांधला जातो
गेल्या शतकात हिंदू धर्मातील मुले व पुरुषांच्या दृष्टीने आवश्यक असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे 'करदोडा!' त्या काळात हिंदू संस्कृतीतील प्रत्येक पुरुषास करदोडा वापरणे अनिवार्य होते.
'करदोडा' म्हणजे कमरेभोवती
बांधावयाचा दोरा किंवा गोफ. हा गोफ आर्थिक परिस्थितीनुसार चांदीचा, रेशमाचा किंवा साधा
दोरा बांधला जात असे. अनेकदा काळ्या रंगाचा रेशमी गोफ कमरेभोवती बांधला जात असे.
यालाच ग्रामीण भाषेत 'करदोडा' किंवा
'कडदोरा' असे
म्हणतात. कडदोऱ्याप्रमाणेच याला 'कटदोरा' किंवा 'करगोटा' असेही संबोधले जात
असे. काही श्रीमंत मुले करदोडा म्हणून चांदीची बारीक साखळी कमरेला बांधत. Health Tips: आपल्या धर्मामध्ये
अनेक गैरसमज आहेत. काही गोष्टी का कराव्यात,
आणि
का करू नयेत, याविषयी अनेक गैरसमज
आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, पुरुषांच्या कमरेला
असणारा करदोडा. असंख्य पुरूषांच्या कमरेला कडदोरा पाहायला मिळतो. मात्र त्यापैकी
अनेकांना आपण कमरेला कडदोरा का परिधान करतो,
याविषयी
माहिती देखील नाही. किंवा कमरेला कडदोरा का घालतात? याविषयीची
अनेक वेगवेगळी कारणे माहिती असतील,
मात्र
आज आपण कमरेला कडदोरा नक्की का घातलात,
याविषयी
धार्मिक आणि शास्त्रीय कारणे जाणून घेणार आहोत..
कमरेला कडदोरा काय म्हणतात? याविषयी आपण सर्वप्रथम धार्मिक कारण जाणून घेऊ.
दिवाळीमध्ये भाऊबीजे दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळताना
आभूषण म्हणून, हातात कडदोरा देते.
हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. बहीन भावाला ओवाळताना आभूषण म्हणून, कडदोरा देते. यासंदर्भात धार्मिक कारण जाणून घ्यायचा
प्रयत्न केला, तर असं लक्षात येतं, आपल्या भावाच्या पाठीमागे कोणत्याही वाईट प्रवृत्ती
लागू नयेत. इडापिडा जाऊन बळीचं राज्य यावं. अशी कामना बहीण भावाला ओवाळताना करते.
काळ्या धाग्यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण होते. त्याशिवाय धनलाभ देखील होतो, असा समज आहे.
मात्र लहान मुलं खूप निरागस असतात. त्यांना याविषयी
काहीही देणंघेणं नसतं. त्यांना जर हे सांगितले,
तर
ते आपल्या कंबरेला कधीच कडदोरा बांधणार नाहीत. आणि म्हणून, त्यांना घाबरवण्यासाठी घरातील ज्येष्ठ मंडळींनी एक
युक्ती वापरली. जर तुम्ही कमरेला कडदोरा बांधला नाही, आणि तेवढ्यात गाढव ओरडलं, तर
तु मुलगी होशील. घरातील ज्येष्ठ मंडळी असं म्हटल्याचा अनुभव तुम्हाला देखील आला
असेल. मात्र आपण मोठे झाल्यानंतर, आपल्या लक्षात आले
यात काहीही तथ्य नाही. अनेकांना धार्मिक कारण पटत असले, तरी वस्तुस्थिति खूप वेगळी आहे. पुरुष कमरेला करदोडा का
बांधतात, याला एक शास्त्रीय
कारण आहे. आता आपण तेही जाणून घेऊ.
पूर्वी
हा करदोडा केवळ एक शोभेची वस्तू म्हणून वापरला जात नव्हता तर धार्मिक आणि
सांस्कृतिक अर्थ प्रकट करणारे प्रतीक म्हणून वापरला जात होता.
संतश्रेष्ठ
तुकोबांनी या शब्दाचा वापर केला आहे. "पायी घागरिया सरी।
कडदोरा वाकी।। " असा उल्लेख एका अभंगात
केला आहे.
कमरेला करदोडा बांधला नाही तर संबंधित व्यक्तीला मुलबाळ होत नाही, असा एक समज वा गैरसमज लोकमानसात आजही आढळतो. त्यामुळे भीतीमुळे का असेना कमरेला करदोडा बांधला जातो.