(लक्ष्मण ठाकरे)
जीवनाशी अभिमुख होऊन जगण्याचे तत्त्व एकदा त्याला
पटल्यावर जगता जगता जी संकटे, दुःखाचे वा सुखाचे, आनंदाचे
क्षण येतील त्या सर्वांकडे साक्षेप बाळगून
म्हणजे त्यास तोंड देऊन वा उपभोगून तो आपले जीवन संपूर्णपणे यशस्वी व समाधानी करू शकतो. सुखी जीवन जगण्यासाठी संतांनी
वा विचारवंतांनी जीवनाच्या यशस्वीतेसाठी जो
मार्ग दाखविला आहे, त्यात कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व
उपासनामार्ग या तिन्हींचा सम्यक विचार करणे व त्याचा अवलंब करणे त्यास क्रमप्राप्त आहे. अशा प्रकारे जगणारा त्याचा
स्वतःचाही व जगाचाही किंवा निदान त्याच्या कुटुंबाचा
वा समाजाचा फायदा करून घेईल. जगता जगताच म्हणजे जगण्याचा
आनंद उपभोगत असताना माणसाने अशा निर्णयास यावे की, आता आपण
खूप जगलो, मनसोक्त
जगलो, जगावयाचे व मिळवावयाचे असे
काही शिल्लक राहिलेले नाही.
तुमचा रुटीन किंवा दिनक्रम काय? असा प्रश्न
मी आपणांस विचारल्यास, आपले उत्तर काय असेल? सकाळी उठून आवरणे, नोकरीवर जाणे, रोजचे काम जमेल तितक्या आवडीने करणे, घरी येऊन परिवारासोबत वेळ घालविणे, मनोरंजनासाठी टी.व्ही. बघणे आणि जेवण वगैरे उरकून झोपी जाणे. आपण गृहिणी असाल, तर यात स्वैपाक करणे, मुलांची काळजी घेणे, त्यांचा होमवर्क
वगैरे करून घेणे, या जबाबदाऱ्यासुद्धा आल्या. हे चक्र रोज त्याच गतीने फिरत असते. जवळजवळ
त्याच वेळेला, रोज त्याच गोष्ट घडत असतात.
अगदी रविवारचे रुटीनसुद्धा तेच-तेच झालेले असते – उशिरा उठणे, मनसोक्त टी.व्ही.
बघणे, पिक्चर बघायला जाणे आणि बाहेर
खाणे.
आयुष्याला शिस्त असणे,
एक व्यवस्थित ढाचा असणे, ही खरेतर चांगली गोष्ट आहे, नाही का? पण मग आपण आपल्या जीवनात आनंदी का नसतो?
‘कंटाळा आला तेच तेच करून’; ‘हरवल्यासारखं झालंय’; ‘बोअर झालंय’….अशी वाक्ये सारखी का ऐकू येतात? आपले काम, आपला परिवार, सगळेच आपल्याला आवडत असते. मग हे आपल्या
मनासारखे जीवन आपल्याभोवती उभे करूनही, काय निसटते आहे? काय राहून जाते आहे? सारखे आपल्या स्मार्टफोन्समध्ये आपण
नेमके काय शोधत असतो? जीवन खरोखर आनंदी कशाने होते?
याचे उत्तर खरेतर इतके सोपे नाही. कारण आनंद ही अशी एक भावना नाही. पतंग उडविताना जो आनंद मिळतो, तो प्रमोशन मिळाल्यावर होणाऱ्या आनंदापेक्षा वेगळा; पहिल्या पावसात भिजण्याची मजा, ही पहिली कार घेतल्यावर होणाऱ्या हर्षापेक्षा निराळी. आपला पिंड काय, आपल्याला काय आवडते, यानुसार आपला आनंद कशात आहे, हे ठरत जाते. पण या सगळ्यामध्ये एक घटक सातत्याने असावा लागतो –
आनंदाचा ध्यास आणि तो मिळविण्याची
‘रोज एक तास व्यायाम’, ‘एक तास लिखाण’, ‘अर्धा तास वाचन’ असे अनेक निर्धार आपण नववर्षाच्या सुरुवातीला करतो.
जानेवारीच्या साधारण दुसऱ्या आठवड्यापर्यंत ते
कोलमडतात. पुन्हा त्याच चक्रामध्ये आयुष्य फिरू लागते. पण आपले किती निर्धार खरोखर
मनापासून केलेले असतात? एखादी गोष्ट मनापसून आवड असते, म्हणून ती आपण करतो का? आपल्याला मनापासून खरंच काय आवडते,
हे आपल्याला माहिती आहे का?
तेच माहित नसल्यास, आपल्याला आनंद कुठून मिळतो, त्याचा नेमका (आपल्यासाठीचा) स्त्रोत
कुठला, हेच आपल्याला कळणार नाही.
मग आतला आवाज कायमचा मरतो का?
अजिबातच नाही. मानवी मेंदू, त्याचे मन, हे विचार करण्यासाठीच बनलेले आहे. ते कार्य ते सतत करतच असते. कुठल्या न कुठल्या दिशेने ते विचार करतच असते. आनंदी असण्यासाठी मात्र, गरज असते ती या विचारांना योग्य दिशा देण्याची. आणि ही दिशा मिळते, ती
पण म्हणून आपली एकमेकांना भेटण्याची आसक्ती कमी होते का?
एखाद्या निवांत दुपारी मित्रांबरोबर
बसून पिझ्झा खाण्याची गंमतच निराळी! घरी जाऊन आईला एवढ्या-तेवढ्या
कामांमध्ये मदत करत, तिच्याशी
गप्पा मारण्यातून मिळणारा आनंद कितीतरी मोठा! याचाच अर्थ असा, की अजून तरी, आपण पूर्णपणे आभासी जगात जगायला सुरुवात
नाही केलेली. प्रत्यक्ष भेटीची, संवादाची
उर्मी, त्यातून मिळणारी उर्जा, यांची आपल्याला अजूनही हाव आहे.
पण हे नाहीच जमत! आणि यात आपला किंवा समोरच्याचा दोष नाही.
आधुनिक जीवनाच्या गरजा, त्याची
गती इतकी आहे, की
एका छाताखाली राहूनही, आपल्याला एकमेकांशी बोलायला, एखादी संध्याकाळ राखीव ठेवून, हॉटेलात जावं लागतं (फ्री वायफाय न
देणाऱ्या!). परिणामी, विसंवाद वाढत जातो. किंवा संवाद गायबच
होत जातो. एक घुसमट तयार होत जाते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपला आतला आवाजही दबत जातो.
टी.व्ही. किंवा इतर माध्यमांतून, जे मनोरंजनासाठीचे कार्यक्रम दाखविले
जातात, त्यातून हा समज अधिक
दृढ होत गेला आहे. यात संमोहित व्यक्तींना त्यांचे कपडे काढायला लावणे,
विकृत चाळे करायला लावणे, चोऱ्या करायला लावणे, असे विविध प्रकार दिसतात. मूळतः त्यांची
टर उडवून, त्यातून
विनोदनिर्मिती करण्याचा हा प्रयत्न असतो.
विद्यार्थी, महिला,
पोलीस, खेळाडू अशा विविध गटांना, त्यांच्या विशिष्ट
समस्येनुसार नेमकी मदत यातून करता येते. हे उपचार तुम्हाला दीर्घकाळ परिणाम
दाखविणारे आणि महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला
आत्मनिर्भर करणारे असतात. कुठल्याही लंबकाची, कुठल्याही जादूची यात गरज नसते. कारण
खरी जादू, ही तुमच्या अंतर्मनात
असते, त्याच्यात असलेल्या
अगाध शक्तीमध्ये असते. या अंतर्मनाशी तुमचा संवाद सुरळीतपणे सुरु
झाला, की आनंद, हास्य, समाधान, या तितक्याशा अवघड गोष्टी राहत नाहीत.
‘आयुष्य सुंदर आहे’, ‘आनंद आपल्या अवतीभोवतीच असतो’, अशी वाक्ये आपण अनेकदा ऐकतो. पण आनंद खरेतर आपल्या मध्येच आहे. त्याला वाट करून देणे, त्याला दिशा देणे, हे आपले काम आहे. मग रुटीनही मजेदार वाटू शकतो आणि रोजचे आयुष्य आनंददायी होऊ शकते. गरज आहे, ती स्वयंस्फूर्ती शोधण्याची, आपला आतला आवाज शोधण्याची, परस्पर-संवाद साधण्याची. आनंदाच्या रेसिपीचे हे सगळे घटक आहेत. संमोहन केवळ एक माध्यम, एक धग आहे, जी या सगळ्या घटकांना एकजीव करते.

