सकाळी किती वाजता उठता, रात्री कधी झोपता...?
![]() |
| Image |
सकाळी किती वाजता उठता, रात्री कधी झोपता...?
तुम्ही सकाळी किती वाजता उठता, दिवसभर काय करता, रात्री किती वाजता झोपता याचे
सर्वेक्षण आता राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने करण्यात येणार आहे.येत्या
सोमवारपासून (१ जानेवारी) देशभरामध्ये हे सर्वेक्षण होणार असून, त्यासाठीची प्रश्नावलीही
तयार करण्यात आली आहे.
३१ डिसेंबर २०२४ पर्यंत हे सर्वेक्षण चालेल. 'वेळेचा उपयोग सर्वेक्षण' असे याला नाव देण्यात आले
आहे. सर्वेक्षक संबंधित घरी
जाऊन करणार नोंद. केंद्र शासनाच्या
राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्यावतीने विविध प्रकारची सर्वेक्षणे करण्यात येतात.
आता या विभागाचे सर्वेक्षक संबंधित घरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची माहिती संकलित
करतील. त्यामध्ये पूर्ण नाव, पत्ता, व्यवसाय, नोकरी, संपर्क क्रमांक ही सर्व वैयक्तिक माहिती भरून घेतली जाईल.
मोबाइलवर किती वेळ देता, याचीही माहिती घेणार
असे होणार सर्वेक्षण...........
प्रत्येक गावातील आणि
मोठ्या शहरातील प्रत्येक वॉर्डातील १४ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
पहाटे चार ते दुसऱ्या दिवशी पहाटे चार या काळात या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती
किती वेळ, कोणते काम करते याचे
संकलन होईल. मोबाइलवरील वेळही तपासली जाणार आहे.
