उप-मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहिण या योजनेचा पहिला व दुसरा दोन्ही हप्ते ३००० रु एकदाच मिळणार असे सांगितले.
| उप मुख्यमंत्री अजित पवार |
लाडकी बहीण योजनेला महिलांकडून राज्यभरात मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधकांकडून या योजनेविषयी गैरसमज पसरविण्याचे काम केले जात आहे; मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नसून केवळ दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याची टीका महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी परभणीत रविवारी पत्रकार
परिषदेत केली. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रविवारी परभणी शहरातील पाथरी रस्त्यावर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर तटकरे बोलत होत्या. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या हितार्थ आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत दीड कोटी महिलांची राज्यभरात नोंदणी करण्यात आली आहे. ही नोंदणी
अडीच कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. या योजनेत कुठलीही मर्यादा देण्यात आलेली नाही. ३१ ऑगस्ट नंतरही वंचित राहिलेल्या महिलांची नोंदणी सुरूच राहणार आहे. ही केवळ पहिली प्रक्रिया असल्याने आम्हाला त्यामध्ये सुधारणा करावी लागत आहे. या योजनेला राज्यभरातील महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता विरोधकांकडून या योजनेबाबत गैरसमज पसरविले जात आहेत; मात्र त्यात कोणतेही तथ्य नाही. महिलांना ही योजना आवडलेली आहे. त्यामुळे विरोधकांच्या या गैरसमजाला महिला बळी पडणार नाहीत. येत्या ऑगस्ट रोजी बहुतांश महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार असल्याचीही माहिती यावेळी तटकरे यांनी दिली. याप्रसंगी आमदार राजेश विटेकर, आमदार मेघना बोर्डीकर, आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज , भावना नखाते यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती