शबरी घरकुल योजना — पंचायत समिती मंठा येथे आदिवासी समाजाची मागणी
स्थान: पंचायत समिती मंठा
दिनांक: ३ नोव्हेंबर २०२५
आज पंचायत समिती मंठा येथे आदिवासी शबरी घरकुल योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप एकही हप्ता जमा न झाल्याने गावातील आदिवासी बांधव नाराज आहेत. या समस्येबाबत प्रशासनाकडून योग्य उत्तर न मिळाल्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येऊन पंचायत समिती कार्यालयात आपली मागणी मांडली.
गेल्या काही महिन्यांपासून या विषयावर चर्चा होत होती. गावातील आदिवासी बांधव प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधत होते, पण ठोस निर्णय मिळत नव्हता. यामुळे आज सर्व आदिवासी समाज पंचायत समिती मंठा येथे एकत्र आला आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या बैठकीत पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांनी संवैधानिक पद्धतीने लोकांची मते ऐकून घेतली. त्याचबरोबर पुढील कार्यवाहीबाबत खात्री दिली.
या प्रसंगी खंदारे दहिफळ, अनमोल दुबळक्कर (उपाध्यक्ष, रावण युवा फाउंडेशन, जलना), नंदू भाऊ ठाकरे (जिल्हा अध्यक्ष, भारतीय आदिवासी पँथर संघटना), नितीन भाऊ दुबळक्कर (आदिवासी समाजसेवक) आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज अधोरेखित केली. प्रत्येक आदिवासी कुटुंबाला घरकुलाचा लाभ मिळावा आणि निधी थेट त्यांच्या खात्यात जमा व्हावा, ही सर्वांची एकमुखी मागणी होती.
तरी 8 दिवसात समस्या दूर होईल आणि खात्यात पैसे जमा होतील असे आश्वासन दिले
शेवटी समाजातील प्रतिनिधींनी सांगितले की, “शासनाने आदिवासींसाठी राबविलेल्या योजना प्रभावीपणे राबविणे हा प्रशासनाचा कर्तव्य आहे. यासाठी पारदर्शकता आणि जबाबदारी आवश्यक आहे.”
— लेख: लखन ठाकरे
