पत्नी गर्भवती; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
न्यूज नेटवर्क हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील
युवकाने अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने गर्भवती
राहिली. याबाबत पुणे शहर पोलिसांत दाखल झालेली तक्रार आखाडा बाळापूर पोलिसांत वर्ग
केली असून, पाचजणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
सदर मुलगी ही १४ वर्षे पाच महिन्यांची असल्याचे माहिती असताना तिच्या
आई-वडील, सासू, सासऱ्यांनी तिचे उमरखेड
तालुक्यातील एका गावात लग्न लावून दिले, तर ती अल्पवयीन
असल्याचे माहिती असतानाही तिच्या पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
नोकरीनिमित्त तिला पुणे येथे नेले होते. तेथे हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे
तेथील एका स्त्रीरोगतज्ज्ञ महिलेने याबाबत पुणे शहर पोलिसांत तक्रार नोंदविली
होती. हा गुन्हा आखाडा बाळापूर पोलिसांकडे वर्ग केला आहे. यात मुलीचे नातेवाईक,
नवरा
मुलगा व त्याचे नातेवाईक अशा पाचजणांवर गन्हा दाखल झाला आहे..
Lokmat
news links