चिऊताईसाठीही घरकुल योजना जागतिक चिमणी विशेष


 छत्रपती संभाजीनगर :




शहरीकरणाच्या जंगलात व आता झाडे नष्ट होत आहेत. - माणूस आपल्या घरकुलासाठी न पशुपक्ष्यांचा निवारा हिरावून घेत आहे. म्हणजेच प्रचंड वृक्षतोड होत आहे. त्यामुळे झाडावर राहणारे 1 अनेक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यात आता चिमणी तर दिसेनाशीच होत ' आहे. या चिऊताईचे संवर्धन व्हावे म्हणून 1 महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंदिरानगर बायजीपुरा या शाळेने - चिऊताई घरकुल योजना हा उपक्रम राबवून जणू . काही निसर्गाला सहकार्य करणाऱ्या पशुपक्ष्यांचे संवर्धनच केले आहे.

शाळेच्या व्हरांड्यात ७० ते ८० चिमण्यांची घरटे लावण्यात आलेले आहे.

या चिमणीच्या घरट्यांचे दिवस वैशिष्ट्य म्हणजे या घरट्यांमध्ये चिमणीपेक्षा मोठा कोणताही पक्षी किंवा साप आतमध्ये जाऊ शकत नाही. चिमण्यांनी तयार केलेले घर, त्यातील गालिचा व त्यात घातलेले अंडे व त्यातून बाहेर आलेले चिमणीची पिल्ले हे

सुरक्षित राहतील. ही घरटी चिमणीला सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे अनेक चिमण्यांनी आपल्या जोडीदारासह अनेक घरट्यांमध्ये आपला संसार मांडला आहे. अनेक घरट्यांमध्ये चिमणीच्या बाळाला

पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रयत्न चालू असतो. अनेक चिमण्यांचे पिल्लांना चोचीत दाणे भरवतानाचे दृश्य पाहून शाळेतील विद्याथी पाहताना आनंदी होतात.

चिमण्या संसार थाटू लागल्या !



चिमणीच्या घरट्यांची चिमणी मित्र गुरव यांच्याकडे मागणी केली आणि त्यानुसार ७० ते ८० घरटे त्यांनी पाठवले. ती अशा ठिकाणी बसविण्यात आली की चिमणीला स्वतःच्या कुटुंबासाठी सुरक्षित वाटेल. शाळेच्या परिसरात असलेली विविध झाडे फुलझाडे त्यावर असणारी विविध प्रकारचे लहान लहान फुलपाखरे, किडे हे चिमण्यांचे अन्न शेजारीच असल्यामुळे काहीच दिवसांमध्ये अनेक चिमण्या आपले संसार त्या घरांमध्ये थाटू लागल्या. आज जवळपास २०० ते ३०० चिमण्या या घरकुलांमधून पाहायला मिळतात




थोडे नवीन जरा जुने